सरकारनामा ब्यूरो
मयंक शर्मा हे 'यूपीएससी'च्या 1989 च्या बॅचचे भारतीय संरक्षण लेखा सेवा 'आयडीएएस' अधिकारी आहेत.
मयंक शर्मा यांची कंट्रोलर जनरल ऑफ डिफेंस अकाउंट्स (CGDA) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1 मार्च 2025 ला त्यांनी पदभार स्वीकारला.
शर्मा यांना भारतीय संरक्षण लेखा सेवेचा (IDAS) 25 वर्षाचा अनुभव आहे.
शर्मा यांनी भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. यामध्ये संरक्षण वित्त व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि राजकीय धोरण ठरवणे यांचा समावेश आहे.
शर्मा यांनी कॅबिनेट सचिवालयात महत्त्वाच्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्वही त्यांनी केले आहे.
सीजीडीए असलेल्या शर्मा यांनी व्हिएन्ना येथील भारतीय दूतावासाच्या कॉन्सुलर विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभळला आहे.
त्यांनी युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम (UNODC) मध्ये उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळांचे नेतृत्व केले तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय मंचांवर भारताची भूमिका मजबूत बनवण्यात मोलाची कामगिरी बजावली.
संरक्षण लेखा महानियंत्रक (CGDA) हे संरक्षण लेखा विभाग (DAD) चे निरीक्षण करतात. ते भारतीय सशस्त्र दल आणि इतर संरक्षण संघटनांच्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करते.