Rashmi Mane
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन पत्रकार, शिक्षक आणि नंतर राजकारण. त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. १९७० मध्ये तरुण भारत या मराठी वृत्तपत्रामध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतला प्रवास आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्राचे ते मुख्य संपादक आहेत. राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आले आहे.
नगरपालिकेचे सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. राजकारणात येण्याआधी त्यांनी 'गोदीवरी टाइम्स' या वर्तमानपत्रातून पत्रकारितेची सुरुवात केली. राजकीय कारकिर्दीत त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या (राज्यमंत्री) आणि संसदीय कार्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
मराठीतील पत्रकार, विचारवंत आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. दैनिक 'लोकसत्ता'चे ते निवृत्त प्रमुख संपादक होते. तसेच 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकमत' दैनिक 'दिव्य मराठी' या वृत्तपत्रांचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.
'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील हेसुद्धा पत्रकारितेतूनच राजकारणात आले आहेत. इम्तियाज जलील यांनी 2014 ला पत्रकारिता सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. लोकमत आणि 'एनडीटीव्ही' वाहिनीचे ब्युरो चीफ म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार एम. जे. अकबर हे पत्रकारितेतील मोठे नाव आहे. ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. भारतातील प्रमुख इंग्रजी नियतकालिक 'इंडिया टुडे'चे ते संपादक होते.
राजकारणात येण्यापूर्वी ते 'जनसत्ता' या हिंदी दैनिकात पत्रकार होते. त्यानंतर त्यांची वरिष्ठ संपादक म्हणून नियुक्ती झाली आणि 2000 मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले.
भरतकुमार राऊत हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. ४ दशकांहून अधिक काळ राज्यसभेत होते. त्यांनी अनेक इंग्लिश आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तसेच सरकारी आणि खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी देश-विदेशात पत्रकारिता केली आहे.
Next : पहिल्यांदाच राज परिवारातील सदस्य, शाही पदवीचा त्याग करत झाले IAS अधिकारी