सरकारनामा ब्यूरो
भारतात दरवर्षी 4 मार्चला (National Security Day) राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
पोलिस, निमलष्करी, कमांडो, सैन्य अधिकारी आणि आपल्या देशाची शांतता तसेच सुरक्षा राखणाऱ्या इतर दलांचाही समावेश आहे.
4 मार्च 1966 रोजी कामगार मंत्रालयाने दीर्घकालीन सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणीय चळवळींना प्रोत्साहन देण्यासाठी या दलाची स्थापना केली होती.
सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाचा प्रचार करण्यासाठी संस्थांना मदत करणे हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
1972 मध्ये तामिळनाडूमधील खत कारखान्यात झालेल्या एका दुःखद अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.
त्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने (NSC) हा दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली होती.
सुरक्षिततेबद्दल जागरुकता वाढावी म्हणून 1972 पासून दरवर्षी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि आयोजनाची जबाबदारी NSC ने घेतली.
आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी दरवर्षी नवीन थीम ठरवली जाते. याद्वारे जनतेमध्ये सुरक्षिततेबाबतीत जागरुकता वाढवली जाते.
सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी या वर्षी "ईएसजी उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करा" ही थीम आहे.
R