Sharad Pawar : 85 वर्षांचे तरुण लढवय्या राजकारणी ! शरद पवार यांचा राजकीय प्रवास कसा होता...

सरकारनामा ब्यूरो

शरद गोविंदराव पवार

देशातील राजकारणात एक नावं आदराने घेतलं जातं ते म्हणजे शरद गोविंदराव पवार. त्यांचा जन्म बारामतीत 12 डिसेंबर 1940 झाला.

Sharad Pawar | sarkarnama

शिक्षण

बारामतीमधील सरकारी शाळेत शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी पुण्यातील BMCC मधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.

Sharad Pawar | sarkarnama

राजकारणात प्रवेश

कॉलेजमध्ये असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवत ते सरचिटणीस बनले.

Sharad Pawar | sarkarnama

यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाणाशी त्यांची भेट झाली. चव्हाणांनी त्यांची राजकारणाची आवड ओळखून त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बनवले.

Sharad Pawar | sarkarnama

पहिली निवडणूक

1967 ला त्यांनी बारामती विधानसभेतून पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली.

Sharad Pawar | sarkarnama

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

1978 ला ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतरही त्यांनी 1988, 1990 आणि 1993 मध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.

Sharad Pawar | sarkarnama

राष्ट्रवादीची स्थापन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन केली.

Sharad Pawar | sarkarnama

BCCIचे अध्यक्ष

2005 ते 2008 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. 2010 ते 2012 या कालावधीत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष, तसेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले.

Sharad Pawar | sarkarnama

पद्मविभूषण पुरस्कार

केंद्र सरकारकडून 2017 मध्ये त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Sharad Pawar | sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदींनी लिहिली सैफ-करिनाच्या लेकांसाठी खास पोस्ट, पाहा फोटो

येथे क्लिक करा...