सरकारनामा ब्यूरो
काटोलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
मात्र, त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील देशमुख हे आता काटोलमधून लढणार आहेत.
ते नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर कोशिश फाऊंडेशनचेही अध्यक्ष आहेत.
अनिल देशमुख 1995 पासून काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
2014 च्या निवडणुकीत ते एकदाच पराभूत झाले होते. याच मतदारसंघावर सलील देशमुख यांनी दावा केला होता.
शरद पवार यांना भेटत सलील देशमुख यांनी स्वत:हा काटोलमधून उमेदवारी मागितली होती.
अनिल देशमुखांनी माघार घेतली नसती तर सलील हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती.
पक्ष ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा आदेश देईल, तेथून लढण्याची आपली तयारी असल्याचेसुद्धा सलील देशमुख यांनी सांगितले होते.