सरकारनामा ब्यूरो
माजी आमदार तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. आज (मंगळवारी) वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेची उमेदवारी जाहीर झाली.
तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात 2015-2019 पर्यत सदस्या होत्या.
शिवसेनेचे विद्यमान आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत या 2015 च्या वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
काँग्रेसकडून नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना या चुरशीच्या लढतीत सुमारे 20 हजार मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.
2019 ची निवडणूक तृप्ती सावंतांनी अपक्ष लढल्याने शिवसेनेला फटका बसला होता.
तृप्ती सावंत यांना मनसेमध्ये प्रवेश देत राज ठाकरेंनी भाजपसह उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेलाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे.