Jagdish Patil
अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती CM फडणवीसांनी दिली आहे.
'दिबां'च्या नावाचा ठराव विधिमंडळाने संमत केला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
याच पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील कोण होते आणि नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जात होती? ते जाणून घेऊया.
रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे अध्वर्यू अशी ओळख असलेले आणि माजी खासदार, आमदार व पनवेलचे नगराध्यक्ष असलेल्या दिबांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील असे आहे.
ते कोकणातील शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे 4 वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे 2 वेळा खासदारही होते.
'दिबां'नी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्त जनतेचे नेतृत्व केलं प्रसंगी पोलिसांचा लाठीमार सहन केला आणि तुरूंगातही गेले.
त्यांनी शेतकरी कामकरी पक्षाला मोठं केलं. ते हयात असताना शेकाप महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष होता. मात्र, सध्या शेकापचे रायगड वगळता इतरत्र कुठेही अस्तित्व जाणवत नाही.
जानेवारी 1984 साली 'दिबां'च्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. या आंदोलनात 2 शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करलं तर तिघांनी आत्मबलिदान केलं.
यानंतर दिबा 'शेकाप'मधून बाहेर पडले आणि 16 ऑगस्ट 1999 रोजी शिवसेनेत आले. मात्र ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.
25 जून 2013 साली दि.बा पाटील (87) यांचं निधन झालं. नवी मुंबईतील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आयुष्य झिजवलं म्हणून येथील विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी केली जात आहे.