Rashmi Mane
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत.
त्यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले.
प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी यांची एकूण चल संपत्ती 9 कोटी 24 लाख 59 हजार 264 रुपये आहे. त्यांच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता सुमारे 11 कोटी 14 लाख 02,598 रुपये आहे. यावरून त्यांची एकूण संपत्ती फक्त 20 कोटी 38,61,862 रुपये इतकी आहे.
राहुल गांधी यांनी शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांचे म्युच्युअल फंडात 3.81 कोटी रुपये जमा आहेत, तर त्यांच्या बँक खात्यात 26.25 लाख रुपये आहेत.
वायनाडमधून खासदार म्हणून मिळालेला पगार, बँक ठेवींवरील व्याज, बाँड आणि रॉयल्टी यांचा समावेश आहे.
त्यांच्याकडे 11.15 कोटी रुपयांची स्थावर मालमत्तादेखील आहे. यामध्ये व्यावसायिक इमारती, शेती आणि जमिनीचाही समावेश आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी यांच्याकडे 15.2 कोटी रुपयांचे गोल्ड बॉन्ड्स आहेत.
विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत योजना आणि पोस्टल बचत यामध्ये 61.52 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. राहुल गांधी यांच्यावरही 49.7 लाख रुपयांचे कर्ज आहे.
R