Rashmi Mane
अमरावती येथे प्रदीप मिश्रा यांच्या 5 दिवसीय महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्त अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवरून नवनीत राणा यांच्या नेतृत्वात कलश यात्रा काढण्यात आली.
ही कलश यात्रा पायी चालत भानखेडा येथील हनुमान गढी येथे पोहोचणार आहे
खासदार नवनीत राणा तब्बल 13 किलोमीटर कलश घेऊन पायी चालल्या.
अयोध्या येथील हनुमान गढीवरून पवित्र माती व सात नद्यांचा शुद्ध जल असलेला कलश अमरावतीवरून भानखेडा येथील हनुमान गढीच्या दिशेने निघाला आहे.
हनुमान गढीवर दिवसातून पाच वेळा हनुमान चालीसा पठण केली जाणार.
उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हनुमान चालीसा पठणाला थांबवून दाखवावे असे थेट अव्हान नवनीत राणा यांनी केले.