Ganesh Sonawane
शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी NCC व NSS मध्ये भाग घेतात.
एनसीसी आणि एनएसएस हे केंद्र सरकार मान्यताप्राप्त शैक्षणिक व प्रशिक्षणाशी निगडीत उपक्रम आहेत. मात्र या दोन्हीत मोठा फरक आहे.
NCC चे फुल फॉर्म The National Cadet Corps असा आहे. तर NSS चा National Service Scheme असा आहे.
एनसीसीची स्थापना राष्ट्रीय कॅडेट कॉर्म्स कायदा मंजूर झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४८ साली झाली. तर तत्कालीन शिक्षण मंत्री व्हीकेआरव्ही राव यांनी एनएसएस सुरू केले.
देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हा NCC चा उद्देश आहे. तर राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सामुदायिक सेवेची भावना विकसित करणे हा आहे.
NCC अंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात.
तर NSS मध्ये महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण इ. कार्यक्रमांचा या योजनेत समावेश आहे.
शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी इच्छेनुसार एनसीसीमध्ये प्रवेश घेऊ शकतात. यात सामील झाल्यावर त्यांना सैन्यात प्रत्यक्ष सेवा बजावणे बंधनकारक नसते. एनसीसीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान वय १३ वर्षे तर कमाल वय मर्यादा २६ वर्षे अशी निश्चित केली आहे.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी, तसेच 11 वी आणि 12वीच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.