Rashmi Mane
भारत जगातील सर्वात वेगवान डिजिटल पेमेंट करणारा देश ठरला आहे.
2 ऑगस्ट रोजी भारतात 707 मिलियन यूपीआय व्यवहार झाले आहेत, जे अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहेत.
इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने भारताला Global Fast Payment Leader म्हटले आहे, ज्यात यूपीआयचा मोठा वाटा आहे.
सरकारने पुन्हा स्पष्ट केले की यूपीआय पेमेंट्सवर कोणतेही शुल्क लावले जाणार नाही.
आयकर अधिनियमांतर्गत यूपीआय व रुपे डेबिट कार्ड हे अधिकृत इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यूपीआयच्या व्यवहारांची झपाट्याने झालेली वाढ पाहता, 2017-18 मध्ये ज्या ठिकाणी 92 कोटी व्यवहार होते, ते 2024-25 मध्ये तब्बल 18,587 कोटींवर पोहोचले आहेत.
2017-18 मध्ये 92 कोटी व्यवहार तर 2024-25 मध्ये तब्बल 18,587 कोटी व्यवहार झाले आहेत.
जुलै 2025 ऐतिहासिक महिना ठरला आहे. पहिल्यांदाच एका महिन्यात 1,946.79 कोटी यूपीआय व्यवहार झाले आहेत, भारताच्या डिजिटल क्रांतीचा नवा टप्पा.