महिला अन् ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी अपडेट; 'एनसीएमसी' कार्डबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Deepak Kulkarni

एनसीएमसी कार्ड

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एसटी बसमधून सरकारच्या सवलतीत प्रवास करण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी हे कार्ड असणं बंधनकारक केले आहे.

NCMC Card Big Update | Sarkarnama

...तर सवलती मिळणार नाही

एनसीएमसी (NCMC - नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) हे एक डिजिटल स्मार्ट कार्ड आहे. या कार्ड नसेल तर एसटी (MSRTC) बस प्रवास करताना विविध सवलती मिळणार नाहीये..

NCMC Card Big Update | Sarkarnama

रिचार्जचा विषय...

हे बँकेच्या एटीएम कार्डसारखे एक छोटे कार्ड आहे. 'एक देश, एक कार्ड' (One Nation, One Card) या संकल्पनेवर हे आधारित आहे. यामध्ये आधीच पैसे (रिचार्ज) भरावे लागतात.

NCMC Card Big Update | Sarkarnama

सहज रिचार्ज व तिकीट

प्रवास करताना बसमध्ये कंडक्टरच्या मशीनवरुनही कार्ड टच करून सहज रिचार्ज व तिकीट काढता येते.

NCMC Card Big Update | Sarkarnama

मुदतवाढ

एसटी प्रवासात सवलती घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य केले आहे. तांत्रिक अडचणींमुळे या सक्तीला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

NCMC Card Big Update | Sarkarnama

तांत्रिक अडचणी

सरकारने दिलेल्या नव्या मुदतवाढीनंतर एसटी बसचा सवलतीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनाही दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कार्ड काढताना तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं.

NCMC Card Big Update | Sarkarnama

30 दिवसांत कार्ड

परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी हे कार्ड नाव आणि फोटोसह मिळते. अर्ज केल्यानंतर साधारण 30 दिवसांत नोंदणीच्या ठिकाणी किंवा आगारामध्ये मिळते.

NCMC Card Big Update | Sarkarnama

रिचार्जचा ऑप्शन

सरकारकडून एनसीएमसी कार्डमधील संपलेली रक्कम रोख किंवा युपीआय (UPI) द्वारे पुन्हा भरून रिचार्ज करता येते.

NCMC Card Big Update | Sarkarnama

नोंदणी

सरकारने जाहीर केलेल्या मुदतवाढीनंतर जवळच्या एसटी बस डेपो (आगार) किंवा अधिकृत नियंत्रण केंद्रात जाऊन प्रवाशांना यासाठी नोंदणी करता येणे शक्य होते.

NCMC Card Big Update | Sarkarnama

NEXT: आझाद मैदानावर आंदोलनासाठी नियमावली काय? दिवस, वेळही निश्चित

Azad-Maidan-Protest-Rules.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...