Aslam Shanedivan
राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपला तीन जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक आणि शिंदे गटाकडे एक जागा आली आहे.
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
संजय खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत.
सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार राहिल्या आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे.
त्यामुळे आता हे पती-पत्नी एकाच पक्षातून आमदार झाले आहेत.
कधी काळी काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव असणाऱ्या संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार गटाबरोबर गेले होते.
दरम्यान संजय दौंड, झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुरू होती. पण अजित पवारांनी धक्का देत संजय खोडकेंना संधी दिली आहे.