Akshay Sabale
राष्ट्रवादी कुणाची? आणि आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरविण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हाच निकष अध्यक्षांनी ग्राह्य धरला आहे.
त्या निकषानुसार अजित पवार गटाकडे जास्त आमदार असल्यानं तोच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
नार्वेकर म्हणाले, "मी सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेल्या मार्गदर्शनक तत्त्वांचे पालन केलं."
"राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, हे ठरवण्यासाठी पक्षाची घटना, नेतृत्व रचना, विधिमंडळातील बहुमत, असे हे तीन निकष होते."
"हा निकाल देताना मी सर्वोच्च न्यायालय, विधिमंडळातील नोंदी आणि दोन्ही गटांनी सादर केलेली कागदपत्रे विचारात घेतली."
"मात्र, कायदेशीर निकष पूर्ण झाले नसल्याने पक्षाची घटना, नेतृत्व रचना या दोन कसोट्या या प्रकरणात लागू होत नाहीत."
"त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, हा निर्णय विधिमंडळातील बहुमत या एकमेव निकषावर ठरवणे शक्य आहे," असं नार्वेकरांनी म्हटलं.