Roshan More
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रमजान महिन्याच्या निमित्ताने मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, नवाब मलिक आदी या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.
एकता, समता, त्याग, समर्पण, बंधू भाव वाढीस लावणारा हा रमजानचा पवित्र महिना आहे. रमजान हा फक्त एका धर्मापुरता सीमित नाही,असे म्हणत अजित पवारांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्रिमंडळातील काही मंत्री मुस्लिम बांधवांना उद्देशून प्रक्षोभक वक्तव करत आहेत. त्यामुळे मुस्लिम समजात काहीसे नाराजी वातावरण आहे. मात्र, या इफ्तार पार्टी अजित पवार यांनी संदेश देताना तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे, मुस्लिमांना जो डोळे दाखवणार त्याला सोडणार नाही, असा गर्भित इशारा दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा असलेले छगन भुजबळ देखील इफ्तार पार्टीला उपस्थित होते. त्यांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
खासदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुस्लिम बांधवांचे इफ्तार पार्टीला स्वागत केले.