सरकारनामा ब्यूरो
रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात नगरमधून झाली.
युवा संघर्ष यात्रेदरम्यान नगर येथील जामखेडमध्ये रोहित पवारांनी हलगी वाजवण्याचा आनंद घेतला.
हलगीच्या तालावर रोहित पवारांनीही सर्व संघर्ष यात्रींसोबत धरला ठेका.
जामखेड शहरातील जनतेने रोहित पवारांचे संविधान चौकात वाजत-गाजत जंगी स्वागत केले.
स्वागतासाठी जामखेड येथील सर्व नागरिक आणि नेतेही उपस्थित होते.
संविधान चौकातील संविधान स्तंभाला रोहित पवारांनी अभिवादन केले.
संविधान वाचवण्यासाठी जामखेडमध्ये भव्यदिव्य मशाल 'रॅली' काढण्यात आली होती.
"या 'रॅली'ने माझ्या अंगात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्णाण झाली आहे," असे रोहित पवारांनी सांगितले.