Deepak Kulkarni
पिंपरी चिंडवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी शनिवारी 'मातोश्री'वर शिवसेनेत (ठाकरे गटात) प्रवेश केला.
वाघेरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाघेरे यांना शिवबंधन बांधले.
संजोग वाघेरेंचा हा पक्षप्रवेश पिंपरी-चिंचवड व मावळमध्ये अजित पवार गटासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
वाघेरे यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे हे अजित पवार यांच्या गटात होते.
मोटार रॅलीव्दारे शक्तिप्रदर्शन करत वाघेरे हे शिवसेना प्रवेशासाठी पिंपरीतून मुंबईला रवाना झाले होते.
शिवबंधन बांधले यावेळी त्यांची पत्नी माजी नगरसेविका उषा वाघेरे व इतरही असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला.