सरकारनामा ब्युरो
अजय मुंडे हे धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ आहेत. ते माणिकराव मुंडे यांचे थोरले चिरंजीव आहेत. माणिकराव मुंडे आणि गोपीनाथ मुंडे हे भाऊ होते.
अजय मुंडे यांनी सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांची साथ दिली. धनंजय मुंडे भाजपमध्ये सक्रिय झाल्यावर अजय मुंडे सोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही अजय मुंडे यांनी साथ दिली.
मुंडे कुटुंबियांचे मूळ गाव असलेल्या 'नाथरा' इथली ग्रामपंचायत अनेक वर्षे धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. यामागे अजय मुंडे यांचा मोठा वाटा मानला जातो. 2007 साली ते सरपंच झाले.
अजय मुंडे यांच्या मातोश्रीही सरपंच होत्या. धाकटे भाऊ अभय मुंडे यांनाही संधी मिळाली.
2017 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यांची गटनेते म्हणून निवड झाली.
ते वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बिनविरोध संचालक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्षपद भूषवले.
अजय मुंडे हे धनंजय मुंडे मतदारसंघात नसतानाही सक्रिय असतात. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होतात.
आता वाल्मिक कराडनंतर जगमित्र कार्यालयाची जबाबदारीही अजय मुंडे यांच्याकडेच दिली आहे.