Jagdish Patil
सतीश उर्फ खोक्या भोसलेने एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच खोक्या फरार झाला होता. अखेर आज त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे.
सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.
मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता.
हातात सोन्याचे कडे, गळ्यात सोन्याची माळ घालून फिरत असल्यामुळे त्याला गोल्डमॅन म्हणून ओळखलं जातं.
खोक्याने शिरुर कासार परिसात त्याची दहशत निर्माण केली असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत.
त्याचा हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा आणि कारमध्ये पैसे फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढल्या.
बीडच्या शिरुर शहराजवळ पारधी वस्तीत राहणारा खोक्या राजकारणात देखील सक्रीय आहे.