Mangesh Mahale
'शिवपुत्र संभाजी'महानाट्यात नीलेश लंके यांनी सरदाराची भूमिका बजावली होती.
महानाट्याच्या समारोपात पारनेरमधील लोकनेत्यांनी स्वाभिमानाची तुतारी दिल्लीत फुंकावी, अशी अपेक्षा खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केली होती.
आमदार नीलेश लंके यांनी यावर अद्याप भाष्य केले नसले, तरी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते लंके यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला हवा देत आहे.
लंके यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी दिल्ली अब दूर नही...अशा स्वरूपाची जाहिरात केली होती.
शरद पवार आणि लंकेंनी एकमेकांना चकवा दिल्यानंतर लंकेंनी कोल्हेंची भेट घेतली.
खासदार कोल्हे यांनी''वेट अँड वॉच'असे सांगून आमदार लंकेंच्या प्रवेशाची राजकीय गाठ ताणून धरली.
लंके यांनीदेखील टायमिंग साधत पक्ष प्रवेश आणि लोकसभा लढवण्यावर भाष्य करीत चर्चेचे राजकीय गुऱ्हाळ चालू ठेवल्याने संभ्रम वाढला आहे.
R