Mangesh Mahale
श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील असून, सामान्य परिस्थितीतून त्यांनी उद्योजक होण्यापर्यंत भरारी घेतली आहे.
अनेक वर्षांपासून जळगाव परिसरातील सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत.
श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी रावेर मतदारसंघात मराठा कार्ड खेळले आहे.
रावेर मतदारसंघात सर्वात जास्त मराठा समाजाचे मतदान आहे.
श्री साईराम प्लास्टिक अँड ईरिगेशन ही त्यांची कंपनी असून, सिका या इलेक्ट्रिक टू व्हीलरचे उत्पादक आहेत.
श्रीराम फाउंडेशनचे ते अधक्ष्य आहेत. मराठा समाज भूषण, उद्योग भूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता रक्षा खडसे यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.
R
NEXT: सांगलीच्या उमेदवारीसाठी थेट ठाकरेंना नडणारा काँग्रेसचा युवा चेहरा...