Deepak Kulkarni
शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बंडाळी माजली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. यामुळे सांगलीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात घमासान सुरू आहे.
गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून तयारी सुरू ठेवली होती.
माजी खासदार प्रकाशबापू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव, तर माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत.
विशाल पाटील यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना 3 लाख 40 हजार 871 मते मिळाली. मात्र, त्यांना 1 लाख 60 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
2019 ला काँग्रेसची सांगलीची जागा राजू शेट्टींकडे गेल्यामुळे विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत औपचारिक प्रवेश करून त्यावेळी निवडणूक लढवली. मात्र, नंतर पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली.
R