Nilesh Lanke : तुतारी हाती घेतलेल्या नीलेश लंकेंनी विखे पाटलांना ललकारले

Vijaykumar Dudhale

लोकसभेची उमेदवारी जाहीर

पारनेरचे माजी आमदार नीलेश लंके यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे.

Nilesh Lanke | Sarkarnama

आमदारकीचा राजीनामा

अजित पवारांसोबत गेल्यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांना आमदारकीचा अडथळा येत होता, त्यामुळे नीलेश लंके यांनी 29 मार्च 2024 रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.

Nilesh Lanke | Sarkarnama

शरद पवारांसोबत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नीलेश लंके हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र, आठवडाभरापूर्वी लंकेंनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता.

Nilesh Lanke | Sarkarnama

सुजय विखेंशी लढत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले नीलेश लंके यांची लढत विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी होणार आहे.

Nilesh Lanke | Sarkarnama

अजित पवारांची मागितली माफी

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात अजित पवार यांची लंकेंनी जाहीर माफी मागितली.

Nilesh Lanke | Sarkarnama

दोन लाख मतांनी निवडून येणार

याच मेळाव्यात लंकेंनी विखेंवर हल्लाबोल करताना आपण दोन लाख मतांनी निवडून येऊ, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, डॉन कोण आहे, हे 13 तारखेला कळेल, आव्हानही दिले.

Nilesh Lanke | Sarkarnama

विजय औटींचा पराभव

नीलेश लंके हे 2019 च्या निवडणुकीत विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते विजय औटी यांचा पराभव करून निवडून आले होते.

Nilesh Lanke | Sarkarnama

काही लोकांनी खूप त्रास दिला

नगर जिल्ह्यातील काही कुटुंबांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. आमची विकासाची कामे अडविण्यात आली, अशी खदखदही नीलेश लंकेंनी या मेळाव्यात बोलून दाखवली होती.

Nilesh Lanke | Sarkarnama

बँकेचे अध्यक्ष ते आमदार..! शिवेंद्रराजे भोसले यांचा राजकीय प्रवास

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा