Mangesh Mahale
रोहित पाटील यांनी आज वयाची 25 वर्षे पूर्ण केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रोहित पाटील यांनी यंदा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे.
रोहित पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याचे आज संकेत दिले आहे. शरद पवार, ज्येष्ठ नेते एकत्र येऊन निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
वडील आर.आर. पाटील हे 1991 ते 2015 पर्यंत तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
रोहित यांच्या निवडणूक भाषणांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
2019 विधानसभेसाठी त्यांची आई सुमन पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी रोहित यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी होती.
NEXT : अभिनेत्री पेक्षा कमी नाही ही महिला ऑफिसर; लुक्स आणि स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत