Vijaykumar Dudhale
माढ्याची जागा शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली आहे. माढ्यातून खुद्द महादेव जानकर निवडणूक लढवणार आहेत.
सातारा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरावे लागण्याची शक्यता आहे.
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी वयपरत्वे निवडणूक लढविण्यास नकार दिला, तर माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना सातारा लढवावा लागणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांची शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी खुद्द शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांचा सामना पुन्हा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
नगर दक्षिणमधून आमदार नीलेश लंके यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यांची उमेदवार कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही, याची सध्या काळजी घेण्यात येत आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गटात दाखल झाले आहेत.
(स्व.) विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता बीड लोकसभेसाठी ज्योती मेटे यांचे पारडे जड आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
R