Vijaykumar Dudhale
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती बनवली होती. त्या समितीने पक्षाचा जाहीरनामा तयार केलेला आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा, अशी शिफारस करणार असल्याचेही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे वचन राष्ट्रवादी काँग्रेसने या जाहीरनाम्यात जनतेला दिले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न करणार .
अपारंपरिक वीजनिर्मिती. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाला थांबवायचे असेल, तर अपारंपरिक वीजनिर्मितीला चालना मिळाली पाहिजे.
कृषी पीकविम्याच्या व्याप्तीमध्ये आणि शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेच्या मर्यादेत वाढ करण्याचा प्रयत्न राहील.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा.
जातीनिहाय जनगणना, उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना राबविणार.