Aslam Shanedivan
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले आहे. यावर अद्याप निवडणुक झालेली नाही.
आता भाजप संसदीय बोर्डाने एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेग आला आहे.
त्यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली. तर ही घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर केल्यानंतर केल्याचे ते म्हणाले होते.
उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणारे सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्रातून एकटचे नाहीत.
विशेष म्हणजे उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे सी. पी. राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल ठरले आहेत.
यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना शंकर दयाळ शर्मा यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती.
शंकर दयाळ शर्मा यांची 1987 मध्ये उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. तर ते एप्रिल 1986 ते सप्टेंबर 1987 या काळात राज्याचे राज्यपाल होते.
उपराष्ट्रपतीपदासाठी बिनविरोध निवड झालेले शंकर दयाळ शर्मा 1992 मध्ये देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांनी 1992 ते 1997 पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले.