Rajanand More
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारातील कॅबिनेट समितीने पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सध्याची पॅन कार्ड प्रणाली डिजिटली अद्ययावत करण्यात येणार आहे.
करदात्यांच्या ओळखीसाठी प्राप्तीकर विभागाकडून देण्यात येणारे पॅन कार्ड आता QR कोडसह जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी दीड हजार कोटींचा खर्च केला जाणार.
पॅन 2.0 या प्रकल्पामुळे पॅन कार्ड धारकांना डिजिटल सुरक्षा देण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक फसवणूक आणि डेटा चोरीची शक्यता कमी होणार.
नवीन पॅनला आधारशी लिंक करण्याबरोबरच इतर आर्थिक डेटाही एकत्रित केला जाणार आहे. क्यू आर कोडच्या माध्यमातून हा डेटा लगेच उपलब्ध होऊ शकतो.
पॅन कार्डशी संबंधित सेवा सहज आणि जलद मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे पेपरलेस प्रक्रिया असेल. सुरक्षा आणि दर्जेदार सेवेची हमी मिळेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.
पॅन 2.0 प्रकल्पाअंतर्गत करदात्यांना क्यू आर कोडी असलेले नवीन पॅन कार्ड मोफत दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
जुन्या पॅन कार्डधारकांना नवीन पॅन कार्डसाठी कोणताही अर्ज किंवा प्रक्रिया करावी लागणार नाही. सध्याचे पॅन कार्ड स्वयंचलितपणे अद्ययावत केले जाणार आहे.
देशात जवळपास 78 कोटी जुनी पॅनकार्ड आहेत. हे कार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअऱ 15 ते 20 वर्षे जुने असल्याने अनेक अडचणी येतात. नव्या प्रणालीमध्ये संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्याने तक्रारींसह सर्व कामे जलद होतील.