Ganesh Sonawane
भारतात शासनाच्या परवानगीशिवाय गांजाच्या झाडांची लागवड करणे गुन्हा आहे. शेतात, घराच्या परिसरात किंवा खासगी जागेत लागवड केली तरी कारवाई होऊ शकते.
गांजाच्या बेकायदेशीर लागवडीसाठी NDPS कायदा 1985 मधील कलम 20 लागू होते. या कलमात गांजाच्या झाडांची लागवड करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.
गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी दोष सिद्ध झाल्यास कमाल 10 वर्षांपर्यंत सश्रम कारावास होऊ शकतो.
या गुन्ह्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
स्वतःच्या मालकीच्या शेतात गांजाची लागवड केली तरी कायदेशीर सूट मिळत नाही. अधिकृत परवानगी नसल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.
बेकायदेशीर लागवड आढळल्यास पोलिसांकडून झाडे जप्त करण्याची कारवाई होऊ शकते. यासोबतच पंचनामा आणि पुरावे संकलित केले जातात.
गांजाची लागवड, विक्री, वाहतूक आणि साठवणूक यांसाठी NDPS कायद्यात स्वतंत्र तरतुदी आहेत. त्यामुळे गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षाही वेगवेगळी असू शकते.
देशभरात केवळ उत्तराखंड या राज्यात औद्योगिक आणि वैद्यकीय कामांसाठी गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देण्यात आलीय. अर्थात त्यासाठी आधी परवाना घ्यावा लागतो.