Roshan More
डॉ. निलम गोऱ्हे यांनी २०२६ च्या निवडणुकीत पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
निलम गोऱ्हे या २००२ पासून विधान परिषदेच्या सदस्या आहेत. 2008, 2014, 2020 आणि आता 2026 अशा सलग पाचव्यांदा विधान परिषदेवर जाणार आहेत.
निलम गोऱ्हे यांनी युक्रांदपासून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्या युक्रांदमध्ये सक्रीय होत्या.
मुंबई विद्यापीठाच्या पोद्दार आयुर्वेदीक महाविद्यालयातून त्यांनी बी.एस.ए.एम चे शिक्षण पूर्ण केले.
त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात सामाजिक चळवळीत आहेत. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न मांडले.
शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबादारी होती.
विधान परिषदेच्या त्या विद्यमान उपसभापती आहेत. सभागृहातील अनुभव, उपसभापती म्हणून काम करण्यासाठी लागणारी बौद्धिक कौशल्ये अशा गोष्टी त्यांच्याकडे आहेत.