Deepak Kulkarni
नीटच्या परीक्षेत देशात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावत बारामतीच्या कन्येनं अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
नीट परीक्षेत बारामतीच्या श्रावणी कृष्णा कुदळेने 720 पैकी 710 गुण मिळवले आहेत.
श्रावणीने नीट परीक्षेमध्ये देशात पाचवी तर राज्यात पहिली आली आहे. तर संपूर्ण देशभरात तिने मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.
श्रावणीचे बाबा कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
बारामतीच्या श्रावणी कुदळीनं नीट परीक्षा हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवलं आहे.
तिला बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360, केमिस्ट्रीत 180 पैकी 175 आणि फिजिक्समध्ये 180 पैकी 175 गुण मिळाले आहेत.
श्रावणीनं पुढे जाऊन वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं तिचं ध्येय असल्याचं म्हटलं आहे.