Shubham Khairnar : देशाला हादरवून सोडणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणातील बोगस डॉक्टर शुभम खैरनार कोण?

Aslam Shanedivan

NEET पेपरफुटी

NEET पेपरफुटी प्रकरणाने अख्ख्या देशाला हादरवून सोडले असून या प्रकरणात देशभरातून ८, तर राज्यातून ४ जणांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

Shubham Khairnar | sarkarnaa

शुभम खैरनार

जयपूरमधून तिघे, पुण्यातून दोघे, तर गुरुग्राम, नाशिक, अहिल्यानगरमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेतले असून सीबीआयने नाशिकच्या २७ वर्षीय डॉक्टर शुभम खैरनार अटक केली आहे.

Shubham Khairnar | sarkarnaa

बोगस डॉक्टर

यानंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली असून शुभम खैरनार बोगस डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. येथील एका व्यावसायिक संकुलात स्वतःचे कार्यालय थाटले होते.

Shubham Khairnar | sarkarnaa

लाखोंची माया

स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणारा शुभम खैरनार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थींना समुपदेशन करत असे. यातूनच त्याने लाखो रुपयांची माया जमवल्याचा आरोप होत आहे.

Shubham Khairnar | sarkarnaa

BAMS प्रवेश

शुभम खैरनारने २०२१ साली भोपाळमधील सेहोर येथील श्री सत्य साई विद्यापीठात BAMS प्रवेश घेतला होता. मात्र त्याने शिक्षण पूर्ण केले नाही.

Shubham Khairnar | sarkarnaa

प्रश्नपत्रिका लाखांत विकली

शुभम खैरनारने नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांत विकत घेऊन ती १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे.

Shubham Khairnar | sarkarnaa

वडीलही वैद्यकीय व्यवसायात

खैरनार मुळचा नाशिकच्या नांदगावमधील रहिवासी असून त्याचे वडील मधुकर खैरनार देखील डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ते आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात.

Shubham Khairnar | sarkarnaa

शुभमचा लहान भाऊ

शुभमचा लहान भाऊ भावेश खैरनार हाही याच व्यवसायाशी निगडित असून त्याची फार्मसी आणि प्रयोगशाळा आहे. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली होती.

Shubham Khairnar | sarkarnaa

kumbh Mela Logo : त्रिशूळ, मंदिर अन् नदी...कुंभमेळ्याचे बोधचिन्ह आहे खास, एकदा फोटो पाहाच!

आणखी पाहा