Aslam Shanedivan
राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा भडका उडाला आहे. दरम्यान याच आंदोलनातून नेहा बोरा हा चेहरा चर्चेत आला आहे.
नेहा बोरा या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा असून त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पीएचडी स्कॉलर देखील आहेत.
विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर परखड मत मांडणाऱ्या नेहा बोरा दिल्ली विद्यापीठाच्या देखील विद्यार्थी राहिल्या आहेत.
२९ वर्षीय नेहा बोरा मूळच्या उत्तराखंडच्या खटीमाच्या असून त्यांचे वडील भारतीय सैन्यात होते.
यामुळे त्यांचे बालपण देशातील वेगवेगळ्या शहरांत गेले. तर शालेय दिवसांतच त्यांना साहित्य आणि रंगभूमीची गोडी वाढली.
नेहा बोरा यांचे पदवीचे शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झाले असून पोस्ट ग्रॅजुएशननंतर दिल्लीच्या आंबेडकर युनिव्हर्सिटीमधून मास्टर्सची पदवी घेतली.
सध्या त्या JNU ‘स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्स’ मधून Ph.D चे शिक्षण घेत आहेत.
CAA विरोधात झालेल्या आंदोलनांनंतर आतापर्यंत विविध मुद्द्यांच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला असून नुकताच त्या इंडिया आघाडीच्या आंदोलनात देखील दिसल्या होत्या.