Roshan More
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी IAS सौरभ कटियार यांची एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
सौरभ कटियार हे मूळचे उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यातील सिकंदरा तहसील अंतर्गत येणाऱ्या 'मीरगांव' येथील रहिवासी आहेत.
त्यांनी प्रतिष्ठित आयआयटी कानपूर मधून बीटेक आणि एमटेकची पदवी पूर्ण केली आहे.
सौरभ यूपी बोर्डाच्या १२ वी परीक्षेत ९२.२० टक्के गुण मिळवून संपूर्ण राज्यात तिसरे स्थान पटकावले होते.
विशेष म्हणजे, सौरभ यांनी कोणतीही खाजगी क्लास वा कोचिंग न घेता यूपीएससी (UPSC) च्या कठीण परीक्षेत ऑल इंडिया लेव्हलवर ३३४ वा क्रमांक मिळवला होता.
त्यांनी २०१४ मध्येही सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली होती, त्यानंतर त्यांना IRS मिळाले होते. जेव्हा त्यांची IAS पदी निवड झाली, तेव्हा ते नागपूरमध्ये इन्कम टॅक्स विभागात IRS म्हणून ट्रेनिंग घेत होते.
ते २०१६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. विदर्भामध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.