Rashmi Mane
आत्मविश्वास, प्रेरणा आणि कठोर परिश्रमाच्या बळावर २४ वर्षीय नेहा ब्याडवाल यांनी 'यूपीएससी' परीक्षेत यश संपादन केले आहे.
नेहा ब्याडवाल यांनी UPSC-2022 च्या परीक्षेच्या निकालात संपूर्ण देशात 260 वा क्रमांक मिळवला आहे.
नेहा या मूळच्या जयपूर जिल्ह्यातील जामवारामगडची येथील रहिवासी आहेत.
'आयआयटी' कानपूरमधून अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या नेहाने दुसऱ्याच प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
तीन वर्षे स्वत:ला सोशल मीडिया, नातेवाईक आणि मित्रांपासून दूर ठेवले.
नेहा यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित केले आणि परीक्षेचा अभ्यास केला.
पहिल्या प्रयत्नात नेहाची प्रिलिम्समध्येही निवड झाली नाही, तेव्हा त्या अनेक गोष्टी बदलून नवीन रणनीती घेऊन मैदानात उतरल्या.
नेहा ब्याडवाल या देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी ठरल्या आहेत.