Rashmi Mane
असं म्हणतात जे मोठी स्वप्न बघतात आणि ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना नक्की यश मिळते.
आम्ही आज अशाच एका सक्सेसफुल महिलेबद्दल बोलणार आहोत. जिने अगदी कमी कालावधीत यश मिळवले.
नेहाच्या मेहनतीमुळे आज तिच्या कंपनीची किंमत 75 हजार कोटींवर पोहोचली आहे.
फोर्ब्सने तिला अमेरिकेच्या सेल्फ मेड श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
पुण्यात वाढलेल्या नेहाने अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी लिंक्डइन आणि ओरॅकलमध्ये काम केले, त्यानंतर त्यांनी अमेरिकेत स्वतःची कंपनी कॉन्फ्लुएंट सुरू केली.
नेहाला भारतातील 8 व्या सर्वात श्रीमंत महिलेचा किताब मिळाला आहे.
नेहाची गणना अमेरिकेतील सर्वात यशस्वी महिला उद्योजकांमध्ये केली जाते. नेहा तिच्या यशाचे श्रेय तिच्या वडिलांना देते.