Rashmi Mane
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करताना भाजपने चार विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द केली होती. त्यापैकीच एक खासदार म्हणजे अजय निषाद.
त्यामुळेच अजय निषाद यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपने लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने अनेक दिग्गज राजकारण्यांनी बंडखाेरीचा मार्ग स्वीकारला आहे.
लोकसभा निवडणुकीआधी भाजपला मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागत आहे.
मुझफ्फरपूरचे भाजप खासदार अजय निषाद यांनी मंगळवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अजय निषाद हे माजी मंत्री जय नारायण प्रसाद निषाद यांचे पुत्र आहेत.
भाजपच्या तिकिटावर दोन वेळा खासदार झाले असून, पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
R