Jagdish Patil
नेपाळमधील भीषण महापूरामुळे महाराष्ट्रातील अनेक मराठी भाविक नेपाळमध्ये अडकले होते.
या भाविकांना बिहार सरकारने भारतात आणलं आणि त्यांच्या जेवणाची राहण्याची सोय केली.
जिल्हा प्रशासनाकडून त्यांची जी व्यवस्था केली होती, त्यावर सितामढीचे खासदार देवेश चंद्र ठाकूर हे स्वतः लक्ष ठेवून होते.
याच खासदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चक्क मराठीतून संवाद साधल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
याच पार्श्वभूमीवर बिहारमधील खासदार असूनही उत्कृष्ट मराठी बोलणारे देवेश चंद्र ठाकूर नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया.
ठाकूर यांचं शिक्षण पुण्यातून झालंय, ते पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्येही कार्यरत होते.
1990 मध्ये त्यांनी बिहारमधील बथनाहा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
त्यानंतर 2002 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून बिहार विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.
2004 मध्ये त्यांनी जनता दल (युनायटेड) मध्ये प्रवेश केला त्यानंतर 2008 मध्ये तिरहुत पदवीधर मतदारसंघातून पुन्हा ते विजयी झाले.
त्यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलंय. 2022 मध्ये त्यांची बिहार विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाली.
2024 ला सीतामढी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. ते अद्याप खासदार म्हणून कार्यरत आहेत.