Jagdish Patil
घरकाम करणाऱ्या महिलेवर फार्महाऊसवर बलात्कार केल्याच्या आरोपात जनता दल (सेक्यूलर) पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवन्नाला कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर कोर्टाने मागील महिन्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तो माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू असून तो बंगळुरू येथील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात आहे.
सध्या त्याला ज्या कारागृहात ठेवण्यात आलं आहे तिथे तो नेमकं काय काम करतो? याबाबतची माहिती समोर आली आहे.
तुरूंगात त्याच्यावर ग्रंथालयात लिपिकाचे कामे सोपवण्यात आलं आहे. कारागृहाच्या नियमांनुसार, त्याला अकुशल कामगारांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे.
तर लिपिकाचे काम देण्याआधी त्याला बेकरी, सुतारकाम, बागकाम, पशुपालन आणि हस्तकला असे पर्याय देण्यात आले होते.
या कामासाठी आता खासदार राहिलेल्या रेवण्णाला मोबदला म्हणून दररोज सुमारे 520 रुपये मिळणार आहेत.
आगामी काळात त्याला मिळणारा रोजगार हा कारागृहाच्या नियमांनुसार वाढणार आहे.
रेवण्णावर अनेक गंभीर आरोप आहेत, ज्यामध्ये 3 बलात्काराचे आणि एक लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा समावेश आहे.
प्रज्वलने पीडितेवर 2 वेळा बलात्कार केला आणि त्याचे व्हिडीओ काढले. 2024 च्या लोकसभे दरम्यान हे व्हिडीओ लिक झाल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या.