Mangesh Mahale
नेपाळमधील जनरेशन झेडच्या प्रतिनिधींनी 73 वर्षीय माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे देश सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी न्यायाधीश असलेल्या सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.
नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिलेल्या सुशीला कार्की यांच्या नावाला आंदोलकांचं समर्थन आहे.
नेपाळच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून सुशीला कार्की यांना ओळखलं जातं.
2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती.
न्यायपालिकेत प्रवेश करण्यापूर्वी कार्की या शिक्षिका होत्या.
कार्की यांचा जन्म 7 जून 1952 रोजी विराटनगरमध्ये झाला.
1979 मध्ये कार्की यांनी वकिली करण्यास सुरुवात केली.