Rashmi Mane
लाडक्या बहीणींनंतर महिलांसाठी आणखी एक खास योजना आणली आहे. नोकरदार महिलांसाठी "पाळणा योजना" सुरु केली जाणार आहे. मुलांच्या संगोपनासोबत सुरक्षित वातावरणाची हमी देण्यात येत आहे.
आजच्या काळात महिला घर, नोकरी आणि कुटुंब सगळं सांभाळतात. पण लहान मुलं असताना नोकरी करताना मोठी धावपळ होते. यासाठीच सरकारने "पाळणा योजना" आणली आहे.
या योजनेचा उद्देश नोकरदार महिलांच्या लहान मुलांसाठी सुरक्षित आणि मुलांना योग्य आहार व पोषण, शिक्षण आणि संस्कार, आरोग्य व संगोपन मिळावे यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 345 पाळणा घरे सुरु केली जाणार आहे. यासाठी 60% निधी केंद्र सरकारकडून तर 40% निधी राज्य सरकार देणार आहे.
6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी डे केअर सुविधा राबवण्यात येत आहे. यामुळे नोकरदार वर्गातील महिलांना मुलांना ठेवण्यासाठी सुरक्षित केंद्र तयार होणार आहे.
3 ते 6 वर्षांच्या मुलांना पूर्व शालेय शिक्षण दिले जाईल. मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर.
सकाळी पौष्टिक नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता असे संतुलित आहार मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी होणार आहे. मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर लक्ष दिले जाणार आहे.