Rashmi Mane
करदात्यांसाठी मोठी बातमी. इन्कम टॅक्सचे नियम आता बदलणार असून, नवीन Income Tax Act 2025 लवकरच येत आहे. ज्यामुळे कर प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे!
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) प्रमुख रवि अग्रवाल यांनी सांगितले जानेवारीपर्यंत आयटीआर फॉर्म आणि नवीन नियमांची संपूर्ण माहिती जाहीर होईल.
प्राप्तिकर कायदा 12 ऑगस्ट 2025 रोजी मंजूर करण्यात आला. 1 एप्रिल 2026 पासून हा नियम लागू केला जाणार आहे. नवीन आर्थिक वर्ष 2026–27 पासून पूर्णपणे अंमलात येईल.
नवीन कायद्यानुसार सर्व आयटीआर फॉर्म, टीडीएसचे नियम तसेच इतर कर नियम हे सर्व पुन्हा तयार केले जाणार आहेत, जेणेकरून करदात्यांना प्रक्रिया समजणे सोपे जाईल.
1961 चा जुना प्राप्तिकर कायदा आता बदलला जाणार! नवीन कायदा आधुनिक, स्पष्ट आणि सहज समजणाऱ्या भाषेत तयार केला जात आहे.
नवीन कायद्यात जुनी, गुंतागुंतीची भाषा काढून टाकली आहे. सोपी व सरळ भाषा वापरली जाणार असून अनावश्यक तरतुदी हटवण्यात येणार आहे.
नवीन कायदा आता अधिक कॉम्पॅक्ट करण्यात आला आहे. हा नवीन कायदा 819 वरुन 536 पानांचा केला आहे. तसेच प्रकरणांची संख्या 47 वरुन 23 केली आहे. नवीन कायद्यात शब्दांची संख्या 5.12 लाखांवरुन 2.6 लाख केली आहे.
नवीन कायद्यामुळे कर दर बदलणार नाहीत, नियम आणि शब्दरचना सोपी केली जाणार आहे. ज्यामुळे करदात्यांसाठी प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सोयीस्कर होणार आहे.