Rashmi Mane
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केले आहे की योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार असून अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
मात्र, दरम्यान काही शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की योजनेचे नियम पाळले नसल्यास किंवा कागदपत्रांमध्ये तफावत असल्यास शेतकऱ्याचे नाव योजनेतून वगळले जाऊ शकते.
देशभरातील लाखो शेतकऱ्यांची नावे यावेळी यादीमधून काढण्यात आली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
लाभ मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी शेतकरी स्वतः ऑनलाईन स्टेटस तपासू शकतात. त्यासाठी पुढील पद्धत वापरा.
1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
2. त्यानंतर Beneficiary List या पर्यायावर क्लिक करा.
3. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
4. शेवटी Get Report वर क्लिक करा.
यादीमध्ये तुमचे नाव दिसले तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. जर नाव नसेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे KYC पूर्ण करणे गरजेचे आहे.