नवीन टॅक्स बिलाचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार?

Rashmi Mane

तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार?

सरकारनं सादर केलं नवीन टॅक्स बिल; जाणून घ्या काय बदललंय आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल.

New income tax bill | Sarkarnama

क्रांतिकारी बदल

भारत सरकारने सादर केलेले "नवीन आयकर विधेयक 2025" सहा दशकांपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या कर प्रणालीत क्रांतिकारी बदल घडवणार आहे.

New income tax bill | Sarkarnama

काय आहे नवीन विधेयकात?

5.12 लाख शब्दांच्या जुन्या कायद्याच्या तुलनेत हे नवीन विधेयक फक्त 2.6 लाख शब्दांत तयार करण्यात आला आहे. धारांच्या संख्येत 819 वरून 536 वर आणि प्रकरणांची संख्या 47 वरून 23 वर आणण्यात आली आहे.

New income tax bill | Sarkarnama

विधेयक

1,200 कलमं आणि 900 स्पष्टीकरणं हटवण्यात आली असून, त्याऐवजी सोप्या भाषेतील नियम आणि 57 सारांश देण्यात आले आहेत.

New income tax bill | Sarkarnama

करदात्यांसाठी फायदे

सोपी आणि स्पष्ट भाषा सर्वसामान्य करदात्याला कायदा समजण्यासाठी आता वकीलाची गरज भासणार नाही. जटिल कलमं वगळल्यामुळे कोर्टात जाण्याची गरज कमी होईल. TDS, TCS आणि NGOs संदर्भातील नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत.

New income tax bill | Sarkarnama

कायदा लागू होणार?

21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या अधिवेशनात यावर चर्चा होईल आणि मंजुरी मिळाल्यास हे कायदा म्हणून लागू होईल.

New income tax bill | Sarkarnama

अर्थमंत्र्यांचा विश्वास

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, "हा कायदा कर व्यवस्थेत निश्चितता आणेल आणि प्रामाणिक करदात्यांचे जीवन सुलभ करेल. हे भारताच्या कर इतिहासातील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल."

New income tax bill | Sarkarnama

नवीन आयकर विधेयक 2025

केवळ कायद्यात बदल नाही, तर देशातील आर्थिक व्यवहार सुलभ करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे.

New income tax bill | Sarkarnama

Next : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट! 

येथे क्लिक करा