Rashmi Mane
रेल्वे मंत्रालयाने आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 पासून तिकीट बुकिंगसंदर्भात मोठा बदल केला आहे.
आता ऑनलाईन जनरल रिजर्वेशन तिकीट बुक करण्यासाठीही आधार लिंक आणि ई-व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर जनरल रिजर्वेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत तिकीट बुक करायचे असल्यास प्रवाशांचा आधार नंबर जोडलेला असणे आणि ई-व्हेरिफिकेशन झालेले असणे बंधनकारक असेल.
यामुळे एजंट, सॉफ्टवेअर किंवा बॉट्सद्वारे होणारी मोठ्या प्रमाणावरची तिकीट बुकिंग थांबणार आहे.
जर तुमचा IRCTC अकाउंट आधीच आधारशी लिंक असेल, तर बुकिंगची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. तिकीट बुक करताना आधारशी जोडलेल्या मोबाईलवर OTP येईल.
OTP टाकल्यानंतरच बुकिंग कन्फर्म होईल. या नव्या नियमामुळे पहिल्या १५ मिनिटांत कोणताही एजंट तिकीट बुक करू शकणार नाही. त्यामुळे थेट प्रवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे.
केवळ ऑनलाईनच नाही, तर आता रेल्वे स्थानकावरील PRS काउंटरवरून तिकीट घेतानाही आधार नंबर द्यावा लागेल. तिथेही OTP द्वारे वेरिफिकेशन केले जाईल.
त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही कुटुंबातील सदस्य किंवा मित्रासाठी तिकीट काढत असाल, तरीसुद्धा त्यांचा आधार नंबर आणि त्यावर आलेला OTP द्यावा लागेल.