Rashmi Mane
21 नोव्हेंबर 2025 पासून केंद्र सरकारचे चार नवीन लेबर कोड लागू झाले. बदलत्या गरजा ओळखून हे नियम आणले गेले असून यामुळे कामगारांची सुरक्षा, हक्क आणि पारदर्शकता मजबूत होणार आहे.
सर्वांत मोठा प्रश्न या बदलांचा तुमच्या पगारावर काय परिणाम होणार? सैलरी CTC तशीच राहील, परंतु टेक-होम पगार कमी होऊ शकतो.
नवीन लेबर कोडनुसार कंपन्यांनी सैलरीची रचना व्यवस्थित करणे बंधनकारक आहे. विशेषतः ‘मजदूरी (Wages)’ या घटकाची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे.
सरकारनुसार Basic Pay + DA + Retaining Allowance = एकूण सैलरीच्या किमान 50% असायला हवे. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार आहे.
आतापर्यंत कंपन्या भत्ते (HRA, Special Allowance) वाढवून बेसिक कमी ठेवत होत्या.
पण आता भत्ते 50% पेक्षा जास्त असतील तर तो अतिरिक्त भाग ‘Wages’ मध्ये जोडला जाईल.
बेसिक वाढल्यामुळे PF (12%) आणि Gratuity (4.81%) दोन्ही वाढणार. ही वाढ तुमच्या CTC मधूनच कट होईल. ज्यामुळे टेक-होम सैलरी कमी दिसेल.
आताची व्यवस्था (Basic 40%)
– Basic: 4 लाख
– PF: 48,000
– Gratuity: 19,240
– टेक-होम: 9,32,760
नवीन व्यवस्था (Basic 50%)
– Basic: 5 लाख
– PF: 60,000
– Gratuity: 24,050
– टेक-होम: 9,15,950
टेक-होम थोडा कमी होईल, पण PF, Gratuity वाढेल त्यामुळे सोशल सिक्युरिटी अधिक मजबूत होईल. यामध्ये सरकारचा उद्देश आहे की नोकरीपेशा वर्गाची रिटायरमेंट सुरक्षित करणे याचा दीर्घकाळात तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.