Aslam Shanedivan
नाशिकच्या चांदवडसारख्या ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या 21 वर्षांच्या श्रुती चव्हाण हिने पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
श्रुती चव्हाण हिने पहिल्याच प्रयत्नांत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले असून 575 रँक मिळवली आहे.
श्रुती चव्हाण हिचे आई वडिल दोघंही शिक्षक असून तिचे प्राथमिक शिक्षण चांदवडमध्येच झाले.
तिने शाळेतील एनटीएससी, एमटीएससीसारख्या परीक्षेत यश मिळवले होते.
दरम्यान पुण्यात ‘सकाळ’च्या वतीने घेण्यात आलेली ‘अधिकारी व्हायचे मला!’ या स्पर्धेत तीने इयत्ता सहावीत असताना तालुकास्तरावरचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले
तेंव्हा तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा मिळाले होते. त्याचवेळी तिने ‘आयएएस’ अधिकारी व्हायचे, हे स्वप्नं उराशी बाळगले होते.
श्रुतीने नाशिक येथेच बीए समाजशास्त्रात पदवी घेतली. सलग तिन वर्ष तिने मेहनत घेऊन यूपीएससीचाही अभ्यास केला. आणि एकाच वेळी 2024 मध्ये ती पदवीसह यूपीएससी पास झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.