काय आहे नवीन भाडे नियम 2026? घरमालक, भाडेकरू दोघांनीही कोणते नियम पाळणे आवश्यक?

सरकारनामा ब्यूरो

नवीन भाडे नियम

तुम्ही भाडेकरू किंवा घरमालक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण त्यामुळे आता देशात नवीन भाडे नियम 2026 लागू होणार आहे. या नियमात घरमालक, भाडेकरू यांना कोणते सरंक्षण मिळणार आहे. दोघांनीही कोणते नियम पाळवे लागणार पाहुयात.

New Rent Rules 2026 | Sarkarnama

5 हजारांचा दंड

घर भाड्याने देताना अधिकृत भाडेकरार करणे आवश्यक. या करारात किती डिपॉझिट, किती भाडे उल्लेख आवश्यक, तसेच करार नोंदणी न केल्यास घरमालकाला सुमारे 5 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

New Rent Rules 2026 | Sarkarnama

किती डिपॉझिट

नवीन नियमांनुसार घरमालक दोन महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त डिपॉझिट घेऊ शकत नाही. व्यावसायिक मालमत्तेसाठी सहा महिन्यांचे डिपॉझिटसाठी परवानगी.

New Rent Rules 2026 | Sarkarnama

एकदाच भाडेवाढ

घरमालक वर्षातून एकदाच भाडेवाढ करू शकतो. भाडेवाढ करण्यापूर्वी 90 दिवस आधी घरमालकाला भाडेकरूला लेखी सूचना द्यावी लागणार आहे.

New Rent Rules 2026 | Sarkarnama

नियम

नव्या नियमात घरमालक आणि भाडेकरू दोघांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण हा नियम दोघांनी पाळणे आवश्यक आहे. अनेक शहरामध्ये हे नियमाच पाळले जात नाही.

New Rent Rules 2026 | Sarkarnama

घरातील दुरुस्ती करावी लागणार..

नळ, वीज किंवा इतर किरकोळ बिघाडाबाबत सूचना दिल्यानंतर घरमालकाने साधारण 30 दिवसांत दुरुस्ती करणे अपेक्षित. घरमालकाने दुरुस्ती न केल्यास भाडेकरू स्वतः दुरुस्ती करून खर्च भाड्यातून कमी करू शकतो.

New Rent Rules 2026 | Sarkarnama

पोलिस पडताळणी..

भाडेकरू आणि घरमालकांनी 60 दिवसांत करार करून त्याची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक. तसेच भाडेकरूची पोलिस पडताळणीही करावी लागेल.

New Rent Rules 2026 | Sarkarnama

प्रशासनाकडे तक्रार

भाडेकरू ठेवताना त्याची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देऊन पोलिस पडताळणी केली पाहिजे. भाडेकरूने भाडेकराराचा भंग केल्यास न्यायाधिकरण किंवा छोट्या शहरात संबंधित प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे.

New Rent Rules 2026 | Sarkarnama

NEXT : पठ्ठ्यानं एक ना दोन, तब्बल 20 परीक्षांमध्ये पचवलं अपयश,पण हार न मानलेल्या ड्रायव्हरच्या मुलानं UPSC क्रॅक केलीच

Inspiring UPSC Story | Sarkarnama
येथे क्लिक करा.