UPSC Success Story: पठ्ठ्यानं एक ना दोन, तब्बल 20 परीक्षांमध्ये पचवलं अपयश,पण हार न मानलेल्या ड्रायव्हरच्या मुलानं UPSC क्रॅक केलीच

सरकारनामा ब्यूरो

अपयश

ड्रायव्हरच्या मुलाने 20 परीक्षांमध्ये अपयश स्वीकारले, पण स्वप्न सोडले नाही. अखेर दोनदा UPSC पास करून अधिकारी झालेले विवेक यादव कोण आहेत? तसेच त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया.

Inspiring UPSC Story | Sarkarnama

कोण आहेत विवेक यादव?

मध्य प्रदेशातील चंदेरीचे रहिवासी विवेक नवलसिंह यादव. त्यांचे वडील नगरपालिकेच्या गाडीवर ड्रायव्हर, तर आई घरातून शिवणकाम करून कुटुंबाला आधार देते.

Inspiring UPSC Story | Sarkarnama

शिक्षणाचा प्रवास

विवेक यादव यांनी चंदेरीतील शाळेनंतर दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून इतिहास विषयात ग्रॅज्युएट आहेत, तसेच IGNOU मधून इतिहासात पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे.

Inspiring UPSC Story | Sarkarnama

संघर्षाची सुरुवात

सरकारी नोकरीसाठी तयारी करताना MPPSC, UPPSC, CAPF, BPSC अशा अनेक परीक्षांमध्ये एकूण 20 वेळा अपयश स्वीकारल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे.

Inspiring UPSC Story | Sarkarnama

हार मानली नाही

प्रत्येक अपयशातून शिकत विवेक यांनी पुन्हा, पुन्हा स्वत: मधील कमतरता सुधारत अधिक मेहनत घेत स्वप्नासाठी सातत्याने प्रयत्न केले.

Inspiring UPSC Story | Sarkarnama

पहिली UPSC यशस्वी

UPSC CSE 2024 मध्ये 413 वी रँक मिळवली. त्यानंतर रेल्वे विभागात असिस्टंट कमिशनर पदासाठी निवड झाली. रेल्वेत नोकरी मिळूनही विवेक यांंचे लक्ष्य IPS होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा UPSC देण्याचा निर्णय घेतला.

Inspiring UPSC Story | Sarkarnama

दुसरी मोठी कामगिरी

अखेर दुसऱ्या प्रयत्नात विवेक यांनी UPSC CSE 2025 मध्ये AIR 487 मिळवत IPS अधिकारी होण्याच्या स्वप्नाला गवसणी घातली.

Inspiring UPSC Story | Sarkarnama

हिंदी माध्यमातून तयारी

विशेष म्हणजे हिंदी माध्यमातून UPSCची तयारी केली ही अनेक तरूणांसाठी प्रेरणा आहे. प्रीलिम्स, मेंस आणि मुलाखत या तीनही टप्प्यांमध्ये यश मिळवले. अपयश आले तरी मेहनत आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते. हेच विवेक यांच्या प्रेरणादाई प्रवासतून लक्षात येते.

Inspiring UPSC Story | Sarkarnama

NEXT : जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणाऱ्या कमल सिंग जामवालची हिस्ट्री काय?

Kamal Singh Jamwal Arrested | Sarkarnama
येथे क्लिक करा.