Rashmi Mane
राज्य शासनाची नवीन गाईडलाईन्स; कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर काय करायचं आणि काय नाही, याचे स्पष्ट आदेश!
सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, अन्यथा कारवाई होणार – सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक.
शासनाच्या धोरणावर किंवा कृतीवर सोशल मीडियावर नकारात्मक टीका टाळा.
शासकीय कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मिडिया अकाऊंट स्वतंत्र ठेवणे बंधनकारक.
राज्य व केंद्र शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट्स, अॅप्स यांचा वापर टाळावा.
शासकीय यश सोशल मीडियावर मांडता येईल, मात्र स्वतःची स्तुती होणार नाही याची काळजी घ्या.
खाजगी अकाऊंटवर शासकीय लोगो, गणवेष, इमारत, वाहन यांचे फोटो/व्हिडीओ अपलोड करणे वर्ज्य.
आक्षेपार्ह किंवा गोपनीय मजकूर पोस्ट/शेअर केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार!
गाईडलाइन्सचा भंग केल्यास ‘शिस्त व अपील नियम 1979 ’नुसार कठोर कारवाई होणार त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी नियम पाळावेत!